पुणे :शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ( Dussehra Melawa of Shiv Sena ) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्यासह यांच्या कुटुंबावर ती टीका ( Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde ) केली. वडील मुख्यमंत्री मुलगा खासदार बायको, आमदार आता दीड वर्षाचा मुलगा नगरसेवकाच्या पदाला उभं करण्याची वाट बघत आहेत. त्याला मोठे तर होउ द्या. अशी टीका केली त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या वरती टीका करण्यात येत आहे.
Uddhav Thackeray Mental Patient : उद्धव ठाकरे मानसिक रुग्ण, शिंदे गटाचे मनोरुग्णालयाला पत्र
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) बहुतेक सत्ता गेल्यामुळे ते सैरभैर झालेले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ठीक राहावे. त्यांची मानसिक स्थिती बिघडू नये. आपल्या पुण्यातील मनोरुग्णालयामध्ये असे रूग्ण बरे होतात असा नावलौकिक आहे. त्यामुळे आपल्या पुण्यातील मनोरुग्णालयात ( psychiatric hospital in pune ) एक बेड त्यांच्या शारीरिक दुरुस्तीसाठी राखीव ठेवावा. अशा अशायाचे पत्र ( Shinde group letter to psychiatric hospital ) शिंदे गटाचे पुण्याचे संपर्कप्रमुख अजय भोसले यांनी रुग्णालयाला पाठवले आहे.
शिंदे गटांकडूनच मनोरुग्णालयाला पत्र -त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) यांनी उद्धव ठाकरे यांना, एक भावनिक पत्र लिहिलं. ( MP Shrikant Shinde letter to Uddhav Thackeray ) त्यात दीड वर्षाचा मुलाचा दुखावलेला बाप माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना, म्हणून एक भावनिक पत्र त्यांनी लिहिलेलं होतं .त्याचे पडसाद पुण्यात उमटले. त्याचे बॅनर सुद्धा पुण्यात लागले, त्यानंतर आता शिंदे गटांकडूनच एक पत्र मनोरुग्णालयाला देण्यात आला आहे.
शिंदे गटाचे पुण्याचे संपर्कप्रमुख अजय भोसले ( Pune Liaison Head Ajay Bhosale ) यांच्या लेटर पॅडवर हे पत्र लिहिण्यात आलेले आहे. पत्रामध्ये असे लिहिलेले आहे की, उद्धव ठाकरे हे गेले कित्येक वर्ष राजकारणात आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते ,त्यामुळे त्यांचा राजकारणाशी संबंध फार जुना आहे. त्यांना एवढं सुद्धा कळत नाही. ते दीड वर्षाच्या मुलाचं निरागस मुलाचा राजकारणाशी काय संबंध? बहुतेक सत्ता गेल्यामुळे ते सैरभैर झालेले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ठीक राहावे. त्यांची मानसिक स्थिती बिघडू नये. आपल्या पुण्यातील मनोरुग्णालयामध्ये असे रूग्ण बरे होतात असा नावलौकिक आहे. त्यामुळे आपल्या पुण्यातील मनोरुग्णालयात एक बेड त्यांच्या शारीरिक दुरुस्तीसाठी राखीव ठेवावा. अशी आम्ही विनंती करतो. असे पत्र अजय भोसलेलह त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठवले आहे.