पुणेसाताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात आज संध्याकाळी वृध्दापकाळाने निधन झालं आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले Rajya Sabha MP Udayanaraje Bhosale आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. ते 75 वर्षाचे होते. शिवाजीराजे भोसले Chhatrapati Shivajiraje Bhosale हे कै अभय सिंहराजे भोसले यांचे भाऊ होते.
उदयनराजे भोसले यांचे काका छत्रपती शिवाजीराजे भोसले Chhatrapati Shivajiraje Bhosale यांचे वृध्दापकाळाने निधन झालं आहे. पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये Jehangir Hospital त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी ५.४५ वाजता प्राणज्योत मालवली. शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणला जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
नगराध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवली उद्या अदालत वाडा येथे सकाळी ९ वाजता अदालत वाडयापासून अंतयात्रा काढण्यात येणार आहे. शांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते शाहू नगरीचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी समाज उपयोगी विविध काम केली.
श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्षसातारच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते. त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला हे सातारकर कधीच विसरू शकत नाहीत. त्यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच त्यांनी शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उल्लेखनीय कार्य जे आजपर्यंत चालू आहे त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदिर करंजे यांचे ते कार्याध्यक्ष होत.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे गेले 75 वर्ष साताऱ्यातील आदालत वाडा येथे राहत होते. तो आदालत वाडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता. तो आज देखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक अंतिम मानतात.