पुणे :माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला आहे. यामध्ये गाडीची करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असताना शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ( Attack on Uday Samant Vehicle )
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटात सामील झालेले उदय सावंत हे देखील होते. हडपसर येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री हे आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घराकडे जात असताना उदय सावंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली आहे. यावेळी कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फोडली आहे.