महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolkata to Kanyakumari Cycling : पुण्यातील साठीपार केलेल्या 2 'तरुणांचा' कोलकाता ते कन्याकुमारी सायकल प्रवास - पुण्यातील यंग सिनियर्स सायकल क्लबच्या तरुणांचा प्रवास

व्यायामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी पुण्यातील साठीपार केलेल्या दोन 'तरुणांनी' आरोग्याचा संदेश देत कोलकाता ते कन्याकुमारी (Kolkata to Kanyakumari on bicycle) ही सायकल मोहीम कुठल्याही बॅकअप वाहनाशिवाय पूर्ण केली आहे. स्वामी विवेकानंद जयंतिनिमित्ताने पुण्यातील यंग सिनियर्स (Young Seniors Cycle Club) या सायकल क्लबचे संजय कट्टी (वय ६४) व विजय हिंगे (वय ६२) या दोन सदस्यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे.

Cycling From Kolkata to Kanyakumari
कोलकाता ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By

Published : Jan 19, 2022, 3:16 PM IST

Updated : Jan 19, 2022, 5:24 PM IST

पुणे - जगात कोरोनाने अनेकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे जॉब करणाऱ्या अनेक जणांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू झाले आहे. हे तरुणाईलाही आता आवडू लागले आहे. याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेही दिसू लागले आहेत. व्यायामा न झाल्याने अनेकांमध्ये सांधे, मणका, पाठदुखी, वजन वाढणे तसेच सततच्या स्क्रीनमुळे डोळ्यांच्या समस्या आणि कमी झोप यासारख्या समस्यांच्या विळ्ख्यात तरुणाई सापडली आहे. व्यायामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी पुण्यातील साठीपार केलेल्या दोन 'तरुणांनी' आरोग्याचा संदेश देत कोलकाता ते कन्याकुमारी (Kolkata to Kanyakumari on bicycle) ही सायकल मोहीम कुठल्याही बॅकअप वाहनाशिवाय पूर्ण केली आहे.

माहिती देताना संजय कट्टी

हेही वाचा -हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया, पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

  • २९०० किलोमीटर अंतर २५ दिवसांत पार केलं -
    कोलकाता ते कन्याकुमारी सायकल प्रवास

स्वामी विवेकानंद जयंतिनिमित्ताने पुण्यातील यंग सिनियर्स (Young Seniors Cycle Club) या सायकल क्लबचे संजय कट्टी (वय ६४) व विजय हिंगे (वय ६२) या दोन सदस्यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. १३ डिसेंबरला हावरापासून मोहीम सुरू केली. मोहिमेअंतर्गत पूर्व किनारपट्टीच्या बाजूने उत्तर- दक्षिण असे दोघांनी २९०० किलोमीटर अंतर २५ दिवसांत पार केले. म्हणजे सरासरी रोज ११५ किमी अंतर पार केले. मोहिमेचा मार्ग पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू - कन्याकुमारी असा होता. यंग सिनियर्स हा उत्साही सायकलप्रेमींचा ग्रुप आहे. ग्रुपचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक आहेत. रोज ४०-५० किमी सायकलिंगबरोबरच विकेंडला थोडे लांब पल्ल्याचे पुणे-पंढरपूर, पुणे-मुंबई, पुणे-रांजणगाव अशी सायकलिंग करणे हेच त्यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे.

कोलकाता ते कन्याकुमारी सायकल प्रवास
  • सायकलिंग हे वयावर नाही तर मानसिकतेवर अवलंबून आहे -
    कोलकाता ते कन्याकुमारी सायकल प्रवास

ज्येष्ठ नागरिकांनी उर्वरित आयुष्य चांगल्या तब्येतीने, सुखात आणि समाधानात घालवण्यासाठी प्रेरणा देणे हा या ग्रुपचा सतत प्रयत्न चालू असतो. कधी काळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. सायकलिंग हे वयावर नाही तर मानसिकतेवर अवलंबून आहे, असे या सायकलपटूंकडून सांगण्यात आले. पुणे-गोवा, पुणे-कन्याकुमारी, पुणे-दिल्ली, पुणे-नागपूर, पुणे-लोणार, पुणे-हैदराबाद, सौराष्ट्र अशा लांब पल्ल्याच्या सफारी ते नेहमीच करत असतात, असे देखील यावेळी सायकलपट्टू संजय कट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा -पाहा, मलायका आणि अर्जुनचा पाण्यात सायकलिंगचा व्हिडिओ

Last Updated : Jan 19, 2022, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details