पुणे - सारसबागेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, दुचाकीस्वाराच्या डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक गाडी जागेवर सोडून पसार झाला आहे.
स्वारगेट पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांचे पथक आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप मृत व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडने दुचाकी चालक सारसबागेच्या समोरून आण्णा भाऊ साठे चौकात जात होता. यावेळी पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा डंपर पाठीमागून वेगात आला. यानंतर अगदी गेटसमोरच दुचाकीस्वाराला तो धडकला. यानंतर डंपरच्या चाकाखाली त्याचे डोकं आलं. त्यावरून चाक गेल्याने दुचारीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच स्वारगेट पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतप पंचनामा करण्यात आला आहे.
पुणे : सारसबागेसमोर डंपरखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू - पुणे अपघात वृत्त
सारसबागेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
पुणे : सारसबागेसमोर डंपरखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ महिला सहाय्यक निरीक्षक शेख हे या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत. मृत व्यक्ती वयस्क असून, 60 ते 65 दरम्यान त्यांचे वय आहे. ही दुचाकी हरीलाल ललवाणी या व्यक्तीच्या नावावर असून पुढील तपास सुरू आहे.