महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

FTII Student Suicide : एफटीआयआयमधील दोन्ही आत्महत्यांमध्ये 'हे' आहे एकच साम्य; PM रिपोर्ट आला समोर - पुण्यात विद्यार्थाची आत्महत्या

मागील एका महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आत्महत्या FTII students suicide केली आहे. FTII मध्ये शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या FTII student suicide in Pune केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा वय 25, मूळ उत्तराखंड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

FTII
एफटीआयआय

By

Published : Sep 2, 2022, 11:46 AM IST

Updated : Sep 2, 2022, 12:28 PM IST

पुणे -फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII मध्ये शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या FTII student suicide in Pune केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा वय 25, मूळ उत्तराखंड असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर मागील महीन्यात 5 ऑगस्ट रोजी येथील हॉस्टेलमध्ये एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या Two students of FTII committed suicide केल्याची घटना घडली होती.या दोन्ही आत्महत्या मध्ये एकच साम्य आहे की हे दोन्ही विद्यार्थी जास्त कोणाशी बोलत नव्हते.नेहमी एकटेच राहत होते. काल झालेल्या आत्महत्येच अजूनही पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही.त्यामुळे नेमकं आत्महत्या का केली याच कारण अद्यापही स्पष्ठ झालेलं नाही.

एफटीआयआय

आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप अपष्ट - मागील एका महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. 5 ऑगस्ट रोजी एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे आत्महत्या केली होती. अश्विन शुक्ला असे ( रा गोवा) या मुलाचे नाव आहे. तो शेवटच्या वर्षांत शिकत होता. तर काल 1 सप्टेंबर रोजी नैनिताल येथील विद्यार्थीने एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा (वय 25, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा -Ajit Pawar on Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवारांचे भाष्य

महिनाभरातच दुसरी घटना - कामाक्षी ही मुळची नैनिताल उत्तराखंड येथील राहणारी आहे. 2019 पासून येथील वसतीगृहात राहण्यास आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अ‍ॅक्टींग या कोर्सचे शिक्षण घेत होती. ती एकटीच खोलीत राहत होती. तसेच फारशी ती कोणात मिसळत नव्हती. दरम्यान, गुरुवारी कामाक्षी क्लासमध्ये न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थीनींना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची माहिती डेक्कन पोलिसांना देण्यात आली होती. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील महीन्यात 5 ऑगस्ट रोजी येथील हॉस्टेलमध्ये एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर महिनाभरातच दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

महिनाभरापूर्वीच केली होती एकाने आत्महत्या - 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास प्रभात मार्शलला कॉल आला की बॉईज हॉस्टेल FTII मधील रूम S12 B block मधील अश्विन शुक्ला मूळ गाव गोवा या विद्यार्थाने रूमच्या आतून दरवाजा लॉक करून सुसाइड केले असल्याचे समजले आहे. याबाबतचा तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

एफटीआयआय कायम वादात - देश के गददारोंको, गोली मारो सालोंको’ असे निवडणुकीतील एका रँलीमध्ये वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेतील विद्यार्थ्यांचा रोष पत्करावा लागला. ‘वुई स्टँड अगेंस्ट पॉलिटिक्स ऑफ हेट’, ‘मिनिस्टर ऑफ हेट यू आर नॉट वेलकम’ अशा स्वरूपाचे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी ठाकूर यांच्या विरोधात मूक निदर्शने केली होती. अनुराग ठाकूर यापूर्वी कधी संस्थेमध्ये आलेले नाहीत. त्यांनी पूर्वी राजकीय रँलीमध्ये अल्पसंख्यांकांना लक्ष्य करीत काही वक्तव्य केली होती. देशात जातीय विद्वेष पसरविणारे त्यांचे विचार आम्हाला मान्य नाहीत. त्याचा आम्ही निषेध करतो. हे आम्हाला दर्शवायचे होते. ठाकूर यांनी आम्हाला दोन मिनिटे संवाद साधण्यासाठी वेळ दिला. संस्थेमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. मुलींना कुठं चाललात असे प्रश्न विचारले जातात. हे सर्व मुददे आम्ही त्यांच्यासमोर मांडले असल्याचे अवंती बसर्गेकर ( अध्यक्ष, एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन) यांनी सांगितले होते.

सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट प्रकरण -मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षांना संस्थेच्या संचालकांना एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कथित सरकारविरोधी पोस्ट केल्याप्रकरणी एका प्राध्यापक सदस्याच्या निलंबनाबाबत पुनर्विचार करण्याचे 2019 मध्ये दिले होते. न्यायमूर्ती एस बी शुक्रे आणि न्यायमूर्ती जी ए सानप यांच्या खंडपीठाने सांगितले होते की, एफटीआयआय संचालकांनी प्राध्यापक सदस्य इंद्रनील भट्टाचार्य यांच्याविरुद्ध केलेला निलंबन आदेश बेकायदेशीर होता. निलंबनाच्या आदेशानंतर भट्टाचार्य यांनी 2019 मध्ये न्यायालयात धाव घेतली होती.

गजेंद्र चौहान नियुक्ती प्रकरण - 2015 मध्ये केंद्र सरकारने गजेंद्र चौहान यांची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. विद्यार्थ्यांनी 2015 मध्ये केलेल्या निषेधानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'विद्यार्थी चित्रपट विभाग' प्रवास कार्यक्रमातून वगळला होता. गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीवरून झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हादरलेल्या महाराष्ट्रातील एका वरिष्ठ आयआयएस अधिकाऱ्याकडे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला हेोता. भारतीय माहिती सेवा (IIS) चे 1992 च्या बॅचचे अधिकारी प्रशांत पाठराबे यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने FTII चे संचालक म्हणून तात्पुरता कार्यभार सोपवला होता.

हेही वाचा -Petrol Diesel Rate Today : राज्यात कुठे पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त आणि महाग, जाणून घ्या आजचे दर

Last Updated : Sep 2, 2022, 12:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details