महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Two FTII Student Suicide : महिनाभरात एफटीआयआयमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या - nainital student suicide in ftii

मागील एका महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. 5 ऑगस्ट रोजी एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे आत्महत्या केली होती. अश्विन शुक्ला असे ( रा गोवा) या मुलाचे नाव आहे. तो शेवटच्या वर्षांत शिकत होता. तर काल 1 सप्टेंबर रोजी नैनिताल येथील विद्यार्थीने एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे.

two ftii students suicide
एफटीआयआयमध्ये आत्महत्या केलेले विद्यार्थी

By

Published : Sep 2, 2022, 8:36 AM IST

पुणे - मागील एका महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. 5 ऑगस्ट रोजी एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे आत्महत्या केली होती. अश्विन शुक्ला असे ( रा गोवा) या मुलाचे नाव आहे. तो शेवटच्या वर्षांत शिकत होता. तर काल 1 सप्टेंबर रोजी नैनिताल येथील विद्यार्थीने एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा (वय 25, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

महिनाभरातच दुसरी घटना - कामाक्षी ही मुळची नैनिताल उत्तराखंड येथील राहणारी आहे. 2019 पासून येथील वसतीगृहात राहण्यास आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अ‍ॅक्टींग या कोर्सचे शिक्षण घेत होती. ती एकटीच खोलीत राहत होती. तसेच फारशी ती कोणात मिसळत नव्हती. दरम्यान, गुरुवारी कामाक्षी क्लासमध्ये न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थीनींना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची माहिती डेक्कन पोलिसांना देण्यात आली होती. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील महीन्यात 5 ऑगस्ट रोजी येथील हॉस्टेलमध्ये एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर महिनाभरातच दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

महिनाभरापूर्वीच केली होती एकाने आत्महत्या - 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास प्रभात मार्शलला कॉल आला की बॉईज हॉस्टेल FTII मधील रूम S12 B block मधील अश्विन शुक्ला मूळ गाव गोवा या विद्यार्थाने रूमच्या आतून दरवाजा लॉक करून सुसाइड केले असल्याचे समजले आहे. याबाबतचा तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details