पुणे -मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. यात, दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास किवळे पुलाजवळ घडली असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. संबंधित बस सांगली पलूस येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली घटना
भरधाव बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगातील बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. संबंधित खासगी बस ही शहापूर, कल्याण येथून सांगली पलूस येथे साखरपुड्याचा कार्यक्रमासाठी जात होते.
बसमध्ये होते एकूण 40 प्रवासी; चालक, क्लीनर फरार
बसमध्ये एकूण 40 प्रवासी होती. सुदैवाने मोठी जीविहितहानी झालेली नाही. मात्र, काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, भरधाव वेगातील बस किवळे पुलाजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटून पलटी होऊन अपघात झाला. अपघात होताच बस चालक आणि क्लीनर दोघे फरार झाले आहेत. अपघातग्रस्त बस पोलिसांनी क्रेन च्या साहाय्याने बाजूला घेतली आहे, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पठाण हे करत आहेत.