पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ( Torrential rains in Pune ) अनेक भागांमध्ये झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ( Tree Falling in Many Parts of City ) त्याचबरोबर जुन्या वाड्यांमधील भिंत कोसळण्याच्या घटनाही घडताना दिसून येत आहे. काल नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोर ( Modern Bakery at Nana Peth ) एका दुमजली वाड्याची भिंत कोसळून ( wall of a two-storey mansion collapsed ) दोन जण जखमी, तर अन्य दोघांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.
नागरिकांना काढले सुखरूप बाहेर : ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. यात कमलाकर झिंजुर्के आणि स्मिता जाधव हे जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर राजेंद्र झिंजुर्के आणि भारती झिंजुर्के हे जे वाड्यात अडकले होते. त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. पुण्यातील बरेच वाडे, इमारती हे जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज असताना, नागरिक तसेच राहत आहेत. अशा मुसळधार पावसात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते.
नवीन बांधकाम चालू असल्याने घटना घडली : नाना पेठ येथील मॉडर्न बेकरीसमोर दोन मजली वाडा असून, त्याच्या शेजारी नवीन बांधकाम चालू असल्याने फाउंडेशनसाठी खड्डे खोदले होते. शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रात्रीच्या 10 वाजल्याच्या या वाड्यातील भिंत कोसळली आणि वाड्यात अडकलेल्या चार जणांपैकी 2 जण हे जखमी झाले असून, बाकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर, जवान चंद्रकांत गावडे, मनीष बोंबले , महेंद्र कुलाळ, विठ्ठल शिंदे, चंदकांत मेनसे, दिंगबर बांदिवडेकर, शिर्के व चालक अतुल मोहिते आणि कर्णे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
महापालिकेने पाच दिवसांपूर्वीच दिल्या होत्या नोटिसा : पाच दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने शहरातील जुन्या वाड्या आणि इमारतींना नोटीसा पाठवायला सुरुवात केली होती. शहरातील जुने वाडे धोकादायक परिस्थितीत असल्याने त्यांना रिकामे करा अथवा पाडा अशी नोटीस महापालिकेने सर्व वाड्यांवर लावली आहे. पुणे पालिकेकडून जवळपास 450 वाड्यांना नोटीस देण्यात आली आहे. पुण्यातील अती धोकादायक जुने वाडे पालिकेकडून पाडण्यातही आले आहेत. या वाड्याची अवस्था फार बिकट आहे.