दुबईला जाणारे दोन प्रवासी सीमा शुल्क विभागाच्या जाळ्यात, ३८ लाखांचे विदेशी चलन जप्त - सीमा शुल्क विभागाच्या जाळ्यात सापडले
विमानाने दुबईला जाणाऱ्या दोन प्रवाशाकडून तब्बल ३८ लाख ७९ हजार ५७५ रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
दोघेजण सीमा शुल्क विभागाच्या जाळ्यात
पुणे - भारतातून अवैधरित्या विदेश चलनाचा गैरव्यवहार करणारे दोघेजण सीमा शुल्क विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. स्पाईस जेटच्या विमानाने दुबईला जाणाऱ्या दोन प्रवाशाकडून तब्बल ३८ लाख ७९ हजार ५७५ रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.