महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2020, 4:57 PM IST

ETV Bharat / city

पुण्यातील जम्बो रुग्णालयासाठी 85 कोटींचा खर्च, 19 ऑगस्टला होणार शुभारंभ

कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांसाठी दोन जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुण्यात सीईओपीच्या मैदानावर तर पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा भाऊ मगर स्टेडियममध्ये हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहे.

jumbo hospitals in pune
पुणे जम्बो रुग्णालय

पुणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांसाठी दोन जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुण्यात सीईओपीच्या मैदानावर तर पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा भाऊ मगर स्टेडियममध्ये हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहे. यासाठीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यात होणाऱ्या या हॉस्पिटलसाठी तब्बल 85 कोटींचा खर्च येणार आहे.

पुण्यात होणाऱ्या जम्बो हॉस्पिटलचे काम दिल्लीतील कंपनीला देण्यात आले आहे. 800 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये 600 ऑक्सिजन आणि 200 आयसीयू कक्ष असणार आहेत. हे संपूर्ण हॉस्पिटल एअरकंडीशनयुक्त असणार आहे. हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची याठिकाणी पूर्तता करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, ड्रेनेजची व्यवस्था, हायटेन्शन पावर ही सर्व कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. दिल्लीत ज्या कंपनीने 1,000 बेडचे हॉस्पिटल उभारले होते, त्याच कंपनीला हे जम्बो हॉस्पिटल उभारणीचे काम देण्यात आले आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांसाठी दोन जम्बो रुग्णालये...

हेही वाचा -कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार ; गेल्या 24 तासांत 62 हजार 538 नव्या रुग्णांची नोंद

या हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळ पुरवण्याचे कामही एका एजन्सीला देण्यात आले आहे. हॉस्पिटल चालवण्यासाठी लागणारे डॉक्टर, मेट्रन, नर्स, वॉर्डबॉय पुरवण्याचे काम मुंबईतील लाईफलाईन एजन्सी करणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणारे इक्विपमेंट पुरवण्याचे काम खासगी एजन्सीला देण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत हे काम देखील पूर्ण होईल. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना सोमवारपासूनच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होईल. येत्या 19 ऑगस्ट रोजी हे हॉस्पिटल सुरू करता येईल त्यादृष्टीने हे कामकाज सुरू असल्याचे पीएमआरडीएचे प्रमुख सुहास दिवसे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) सीईओपी मैदानावर भेट देत या हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतला. हॉस्पिटलसाठी लागणारी मॅनपॉवर कुठून येणार, वारा, पाऊस जास्त झाला तर हॉस्पिटलच्या सुरक्षिततेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी अशा परिस्थितीत हॉस्पिटलला कुठलाही धोका होणार नसल्याबद्दल आश्वस्त केले.

पुण्यात कोरोना रुग्णांसाठी दोन जम्बो रुग्णालये...

तिसऱ्या हॉस्पिटलचा विचार सुरू...

पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खासगी रुग्णालये, ससून हॉस्पिटल, 2 जम्बो रुग्णालये यासारखी यंत्रणा तयार आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास तिसऱ्या हॉस्पिटलचा विचार केला जाईल असे सुहास दिवसे यांनी सांगितले.

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलसाठी 85 कोटींचा खर्च...

सीईओपीच्या मैदानावर तयार होणाऱ्या या जम्बो हॉस्पिटलसाठी साधारण 80 ते 85 कोटी इतका खर्च लागणार आहे. यामध्ये रुग्णालय बांधणीचा खर्च, डॉक्टर, नर्स, स्वछता कर्मचारी यांचा राहण्याखाण्याचा खर्च, रुग्णालयातील इतर साहित्य विकत घेण्यासाठी लागणार खर्च असा एकूण 80 ते 85 कोटी खर्च लागणार असल्याचे सुहास दिवसे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details