पुणे- जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात मिनीबस कोसळून झालेल्या अपघातात 2 जण ठार झाले आहेत. तर, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हिणी घाटात मिनीबस कोसळली, दोघांचा मृत्यू - पुणे
चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुळशी ते ताम्हिणी घाटादरम्यान असलेल्या पुलाचा कठडा तोडून ही मिनीबस ओढ्यात पडली.
![चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हिणी घाटात मिनीबस कोसळली, दोघांचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3121666-thumbnail-3x2-puneacident.jpg)
संजीवनी निवृत्ती साठे (वय ५५) आणि योगेश पाठक अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. अपघातग्रस्त मिनीबस पुण्याहून निघाली होती. अपघातात ठार झालेले दोघेजण पुण्याचे रहिवासी आहेत. कोकणातल्या केळशी भागात फिरण्यासाठी २५ जण मिनीबसमधून जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुळशी ते ताम्हिणी घाटादरम्यान असलेल्या पुलाचा कठडा तोडून ही मिनीबस ओढ्यात पडली.
वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघात घडल्यामुळे मदत पोहचण्यास उशीर झाला. गाडीतील इतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखून अडकलेल्यांना बाहेर काढले. घटनेची माहिती पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी भेट देत जखमींना पौड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.