महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचाऱ्यांना लागण - pune corona news

पोलीस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर संबंधित कॉन्स्टेबलच्या संपर्कात आल्याने अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

pune corona update
पोलीस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

By

Published : Apr 22, 2020, 10:48 AM IST

पुणे -पोलीस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर संबंधित कॉन्स्टेबलच्या संपर्कात आल्याने अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामुळे आणखी दोन 'पॉझिटिव्ह' सापडले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस दलातील तिघांना कोरोनाची लागण झालीय.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 708 वर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 53 झाला आहे. यातील दिलासादायक वृत्त म्हणजे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी (21 एप्रिल) 19 जण कारोनामुक्त झाले. यामध्ये 3 वर्षांच्या मुलीसह 92 वर्षांच्या वृद्धाचा देखील समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details