महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण, ससूनमध्ये एका बेडवर दोन-दोन रुग्ण

पुणे शहरात कोरोना संसर्गामुळे शहरातील रुग्णालयांची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शहरातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात शहरासह जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरून ही रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातील यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून इथल्या स्थितीची दाहकता दाखवणारे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण, ससूनमध्ये एका बेडवर दोन-दोन रुग्ण
आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण, ससूनमध्ये एका बेडवर दोन-दोन रुग्ण

By

Published : Apr 16, 2021, 8:28 PM IST

पुणे - पुणे शहरात कोरोना संसर्गामुळे शहरातील रुग्णालयांची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शहरातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात शहरासह जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरून ही रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातील यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून इथल्या स्थितीची दाहकता दाखवणारे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण, ससूनमध्ये एका बेडवर दोन-दोन रुग्ण

ससूनमध्ये सध्याची स्थिती किती गंभीर झाली आहे याची कल्पना हे व्हिडिओ पाहिल्यावर कळते आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने दाखल होत असल्याने ऍडमिट आणि उपचार करण्यासाठी पुरेशी जागा नाही. एका बेडवर दोन रुग्ण दाटीवाटीने झोपलेले तर एका ठिकाणी दोन रुग्ण ऑक्सिजन लावून बसलेले असल्याचे चित्र सध्या आहे. रुग्णालयात काही रुग्ण तर जमिनीवर देखील झोपले असल्याचे दिसून आले.

रुग्णालयात होणाऱ्या मृत्यचे प्रमाण देखील जास्त-

नागरिकांनी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आवश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शहरातल्या रुग्णायातले बेड फूल आहेत. ससूनमध्ये ऐका बेडवर 2 किंवा 3 पेशंट ठेवले जात आहेत. तसेच रुग्णालयात होणाऱ्या मृत्यचे प्रमाण देखील जास्त आहे. रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्यात येईल, असे दोन तीन दिवसापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र बेडची संख्या वाढवली तरी मनुष्यबळाचा मोठा प्रश्न आहे. सध्या तर ससून मधील निवासी डॉक्टर सुविधा नसल्याने हवालदिल झाले आहेत. अत्यंत कमी मनुष्यबळात हे निवासी डॉक्टर काम करत आहेत.

हेही वाचा-पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details