महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Girl physical abused by Two youths : 'तू तर पुष्पातील श्रीवल्ली' म्हणत पुण्यात दोन तरुणांकडून तरुणीचा विनयभंग - तरुणी विनयभंग सहकारनगर गुन्हा

पुष्पा द राईज ( Pushpa the Rise movie ) या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत असते. त्यातच या चित्रपटातील श्रीवल्ली हे कॅरेक्टर ( Shrivalli character in movie ) लोकांना खूप आवडले . पण पुण्यात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. तू पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्लीसारखी आम्हाला दिसतेस, असे म्हणत पुण्यातील धनकवडी परिसरातील दोघांनी तरुणीचा विनयभंग ( molestation of girl by two youths ) केला आहे.

सहकारनगर पोलीस ठाणे
सहकारनगर पोलीस ठाणे

By

Published : Mar 28, 2022, 7:00 PM IST

पुणे-पुष्पा द राईज या चित्रपटाने सगळ्यांनाच भूरळ घातली होती. पण, या चित्रपटातील भूमिकेवरून दोन आरोपींनी तरुणीचा विनयभंग केला. ही घटना पुणे शहरातील धनकवडी परिसरात घडली आहे.

पुष्पा द राईज ( Pushpa the Rise movie ) या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत असते. त्यातच या चित्रपटातील श्रीवल्ली हे कॅरेक्टर ( Shrivalli character in movie ) लोकांना खूप आवडले . पण पुण्यात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. तू पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्लीसारखी आम्हाला दिसतेस, असे म्हणत पुण्यातील धनकवडी परिसरातील दोघांनी तरुणीचा विनयभंग ( molestation of girl by two youths ) केला आहे. आता या दोघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आणि आरबाज अशी या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा-Police And Warkari Clash Kolhapur : नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावरुन पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

काय आहे प्रकरण?
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यातील धनकवडी येथे राहायला आली आहे. सोमवारी रात्री याच परिसरात ती तरुणी आपल्या घराजवळ थांबली असताना आरोपी सोहेलने तरुणीला पाहत शिट्टी वाजवायला सुरुवात केली. तो तिला म्हणू लागला की तू पुष्पा चित्रपटातील हिरोइन श्रीवल्लीसारखी दिसते. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणत सोहेलने पीडितेला मिठी मारली.

हेही वाचा-Goa Cabinet Sworn Celebration : पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंतांसह नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा; पाहा VIDEO

या सगळ्याचा प्रकारानंतर पीडित तरुणीने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर तिचा सख्खा भाऊ तिथे आला. पण सोहेल आणि अरबाज या दोघांनीही त्याला मारहाण केली. तिथून फरार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अरबाज आणि सोहेल यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहकार नगर पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details