पुणे - पॉर्नोग्राफीला बंदी असतानाही शंभर ते दीडशे चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड झाल्याचे उघडकीस आले आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. राजकरण पुट्टीलाल (वय-24) आणि मनोजकुमार झल्लार सरोज (वय-19) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
चाईल्ड पॉर्नोग्राफी : पुण्यातील दोघांना अटक, गुगलच्या माहितीनंतर पोलिसांची कारवाई - pune cyber crime
पुण्यात बेकायदेशीरपणे शंभर ते दीडशे चाईल्ड पॉर्न व्हिडीओ अपलोड झाल्याचे उघडकीस आले आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुगलने काही दिवसांपूर्वी 35 हजार चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओची माहिती केंद्र सरकारला कळवली होती. त्यानुसार केंद्र सरकारने संबंधित राज्यातील महासंचालकांना माहिती पाठवली. यानंतर पुण्यातून 100 ते 150 व्हिडीओ अपलोड झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे व्हिडीओ ज्या मोबाईल अथवा लॅपटॉपवरून अपलोड झाले आहेत, त्यांच्या यूएलआरवरून संबंधितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, खडक पोलिसांनी अटक केलेले दोघे नात्याने भाऊ आहेत. राजकरण हा सिमकार्डचा मालक असून त्याने मनोजकुमार अल्पवयीन असताना त्याला स्वतःच्या नावावर सिमकार्ड घेऊन दिले. मनोजकुमार याने स्वतःच्या मोबाईलवरून चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी युट्युबवर अपलोड केला होता. खडक पोलिसांनी दोघांनाही अटक केली. हे दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.