पुणे-बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या विकल्याप्रकरणी ( selling abortion pills illegally ) पुण्यातील मेडिकल दुकानांमधील दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गर्भपाताच्या गोळ्या या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत, असा कायदा आहे. ही घटना पुण्यातील मुंढवा रोड येथे असलेल्या लाइफस्टाइल फार्मामध्ये घडली आहे.
अविनाश गवांडे आणि विकास रोकडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
हेही वाचा-Chandrapur Crime : चंद्रपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्याला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक
सापळा रचत अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक विवेक खेडकर ( FDA Inspector Vivek Khedkar ) यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात ( Chandan Nagar Police Station ) तक्रार दिली आहे. मुंढवा येथील लाइफस्टाइल फार्मामध्ये ( Lifestyle Pharma in Mundhwa ) बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने ( Food and Drug Administration Pune ) सापळा रचत एक बोगस माणूस ग्राहक म्हणून त्या मेडिकल स्टोअरला पाठविला. यावेळी गोळ्या विकत असताना मेडिकलमधील दोन जण सापडले.