पुणे- सध्या राज्यभर गाजत असलेला टीईटी परीक्षेतील ( TET 2018 ) गैरव्यवरहार प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. संगनमताने निकालात फेरफार केल्याप्रकरणी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार ( Ashvin Kumar ) आणि परीक्षा विभागाचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे ( Sukhdev dere ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पाचशे परिक्षार्थीकडून प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये घेऊन जमा झालेले पैसे आपसात वाटून निकालात फेरफार करत परिक्षार्थी व शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी चौकशीनंतर शिक्षण आयुक्तांना दिली लेखी माहिती
सायबर पोलीस पुणे शहर ( Cyber Cell ) येथे म्हाडा पेपर फुटी (MHADA Paper Leak ) प्रकरणी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख व त्याचे साथिदार एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ हे अटकेत आहेत. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा 2019-2020 ( TET 2019-2020 ) संबंधी गुन्ह्यातील अटक अभिषेक सावरीकर अटकेत आहे. या सर्वांकडे पुणे पोलिसांनी ( Pune Police ) कसून चौकशी केली असता 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा ( TET 2018 ) मध्येही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्तांसह परीक्षांचे आयोजन करणारे जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बंगळुरुचे तत्कालीन व्यवस्थापक व त्याचे सहकारी यांच्या संगनमताने अपात्र परिक्षार्थ्यांकडून पैसे स्वीकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करुन पात्र दाखविल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी राज्या शिक्षण आयुक्तांना लेखी कळवले होते.
परिक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी केली तक्रार