महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kidney Smuggling Pune : अवैध किडणी प्रत्यारोप प्रकरणी दोघांना अटक; मुख्य आरोपी फरार - किडणी तस्कर प्रकरण पुणे

रुबी हॉल क्लिनिकमधील किडणी प्रत्यारोपण ( Kidney transplant at Ruby Hall Clinic ) प्रकरणी पोलिसांनी अभिजित शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) या एजंटांना अटक केली आहे.

किडणी
किडणी

By

Published : May 26, 2022, 4:03 PM IST

Updated : May 26, 2022, 4:12 PM IST

पुणे -पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. रुबी हॉल क्लिनिकमधील किडणी प्रत्यारोपण ( Kidney transplant at Ruby Hall Clinic ) प्रकरणी पोलिसांनी अभिजित शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) या एजंटांना अटक केली आहे. यांच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार समोर आला आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

प्रतिक्रिया देताना अप्पर पोलीस आयुक्त

किडनी रॅकेट प्रकरणात 2 आरोपी हे अटकेत आहे. त्यांनी स्वतः यात एजंट म्हणून काम केले आहे. यातील जो मुख्य साथीदार आहे तो फरार आहे. त्याचा यात महत्त्वाची भूमिका आहे. या दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता नवीन 4 ते 5 जणांना अश्याच पद्धतीने बनावट कागदपत्रे तयार करून किडनी दिल्याचे समोर आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींकडून ज्यांची किडनी देण्यात आली आहे त्यांचे नाव समोर आले आहे. त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे, अस देखील यावेळी पोकळे यांनी सांगितले. तसेच या किडनी रॅकेटमध्ये आणखी तीन रुग्णालयाची नावे समोर आली आहे. पुणे, ठाणे आणि कोईम्बतूर येथील रुग्णलायांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -Pune Crime : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्रांनीच केली गळा कापून हत्या, दोघांना अटक

Last Updated : May 26, 2022, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details