पुणे - औंध येथील 'पीएनजी ब्रदर्स' या ज्वेलर्समधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात अभिनेता मिलिंद दास्ताने आणि त्याची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. याप्रकरणी 'पीएनजी ब्रदर्स'च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी तक्रार दिली होती.