पुणे - एका २४ वर्षीय महिलेने पुणे आणि गोवा येथे बलात्कार करून. तसेच गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात दाखल झालेला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी रघुनाथ कुचीक यांना तात्काळ अटक करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai on raghunath kuchik ) यांनी केली आहे.
Trupti Desai on raghunath kuchik : शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांना अटक करा, तृप्ती देसाईंची मागणी - भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई
पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवत मुली सोबत शारीरिक संबंध ठेऊन जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.
Trupti Desai
पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवत मुली सोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ वर्षीय तरुणीने दिली फिर्याद
एका २४ वर्षीय तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार पुण्यातील प्राइडहॉटेल, गोव्यातील बाय द बीच या हॉटेलमध्ये नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२२ मध्ये घडला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
कुचीक यांच्यावर सुमोटो दाखल करा
आता या प्रकरणाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. तृप्ती देसाई यांनी कुचीक अटक करून राज्य महिला आयोगाने त्यांच्यावर सूमोटो दाखल केला आहे. याबाबत कारवाईचे आदेश देणे गरजेचे असल्याचेही मत मांडले आहे.