महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Truck Accident : दुभाजक तोडणाऱ्या ट्रकने कार, दुचाकी उडवली 5 जणांचा मृत्यू - भरदाव ट्रकने दुभाजक तोडुन

पुणे अहमदनगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) झालेल्या एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. भरदाव ट्रकने दुभाजक तोडुन (Truck breaking the divider) विरुध्द दिशेने येणाऱ्या कार आणि दोन दुचाकीला धडकल्यामुळे झालेल्या या अपघातात आणखी २ जण जखमी झाले आहेत.

Truck Accident
ट्रकचा अपघात

By

Published : Jan 24, 2022, 10:56 AM IST

Updated : Jan 24, 2022, 12:56 PM IST

पुणे : रविवारी रात्री हा अपघात पुणे नगर मार्गावरील २४ वा मैल येथे झाला अपघातग्रस्त ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता. तर कार आणि दुचाकी नगरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला धडकला.

ट्रकचा अपघात

अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील दोघांचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. ही घटना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत घडली आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पठारे यांनी दिली आहे.

अपघातात मृत
1) स्वप्नील पंडीत केंदळे वय 24 वर्शे रा. कांदीवली मुंबई
2) लिना राजु निकसे
3) तेजस राजु निकसे वय 23 वर्शे रा.दांडेकर पुलाजवळ पुणे
4) विठठल पोपट हिंगडे वय 38 वर्शे
5) रेष्मा विठठल हिंगडे वय 35 वर्शे दोन्ही रा. वासुंदे ता.पारनेर जि.अ.नगर

जखमी
1) सिध्दार्थ संजय केंदळे (18) रा. धायरी ता. हवेली जि.पुणे
2)आषा राजु निकसे
३) राजु सिताराम निकसे
४) रोहन उत्तम बारवेकर रा. न्हावरे ता.षिरूर जि.पुणे

Last Updated : Jan 24, 2022, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details