महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हनी ट्रॅपमध्ये अडकवून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला लुटले; दोघांना अटक

तक्रारदार यांच्या गळ्याला कुऱ्हाड लावून ठार मारण्याची धमकी दिली आणि प्रकरण मिटवायचे असल्यास 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी तडजोड करत दहा लाख रुपयांचे तीन धनादेश तक्रारदाराकडून जबरदस्तीने घेतले आणि त्यांना सोडून दिले.

पुणे पोलीस
पुणे पोलीस

By

Published : Aug 18, 2021, 5:30 PM IST

पुणे - पुण्याच्या कोंढवा परिसरातील हनी ट्रॅपचा प्रकार ताजा असतानाच आता विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. एक महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी एअरफोर्समधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकून लुबाडले. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता उर्फ यादव कुराडे (वय 48), उत्तम कान्होजी कुऱ्हाडे (वय 40), नारायण जाधव (वय 37), अनिल सर उर्फ भाऊ आणि आरती चौधरी या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एका 59 वर्षाच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की तक्रारदार काही दिवसांपूर्वी विमाननगर येथील एका बँकेत गेले होते. यावेळी त्यांना आरती चौधरी हिने फोन केला आणि त्यांच्या नोकरीची चौकशी केली. यावर तक्रारदाराने आपण नोकरी करत नसून स्वतःचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी तरुणीने तक्रारदारासोबत ओळख वाढवली. त्यांच्या व्हाट्सअपवर संपर्क साधत खासगी माहिती घेऊन प्रेमाचे नाटक केले आणि 12 ऑगस्ट रोजी नारायणगाव येथे भेटण्यासाठी बोलावले. दरम्यान तक्रारदाराने देखील या तरूणीवर विश्वास ठेवला आणि तिला भेटण्यासाठी गेले. या तरुणीने तक्रारदारासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याठिकाणी इतर आरोपी आले. त्यावर आरोपी महिलेनेत क्रारदाराने आपल्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने तक्रारदार यांच्या गळ्याला कुऱ्हाड लावून ठार मारण्याची धमकी दिली आणि प्रकरण मिटवायचे असल्यास 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी तडजोड करत दहा लाख रुपयांचे तीन धनादेश तक्रारदाराकडून जबरदस्तीने घेतले आणि त्यांना सोडून दिले.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर आरोपींनी तक्रारदाराला सोमवारी पुन्हा फोन करत आणखी पैशांची मागणी केली. त्यानंतर मात्र तक्रारदाराने विमानतळ पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -अफगाणिस्तानची वाघिण सलीमा मजारी तालिबान्यांच्या ताब्यात, जाणून घ्या कोण आहे ती...

ABOUT THE AUTHOR

...view details