पिंपरी- चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने ( municipal Corporation Pimpri Chinchawad ) तृतीयपंथीना मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले आहे. त्या दिशेने महानगर पालिकेने पाऊल टाकले असून तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. शहरात 5 हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे सर्वसामान्य नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. आम्हाला समाजाने योग्य मान, सन्मान दिला तर आम्ही देखील नोकरी करू शकतो असा विश्वास सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालेल्या तृतीपंथीनी व्यक्त केला आहे. ( transgender are working as security guards )
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने समाज विकास विभागामार्फत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी उपक्रम राबवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, तृतीयपंथी व्यक्तींना महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक आणि ग्रीन पथकात स्थान दिलं आहे. महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारापाशी सुरक्षा रक्षक म्हणून तृतीयपंथी रुजू झाले आहेत. आयुष्यात कधी असा दिवस उजाडेल अस वाटले नव्हते, असे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक यांनी सांगितले आहे.