पुणे -शहर पोलिसांच्या वतीने वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. हा देशातील आणि राज्यातील पहिलाच विभाग आहे. या विभागात संपुर्ण कामकाज महिला पाहतात. फक्त महिला दिनापूरते नव्हे तर कायस्वरुपी या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
पुणे शहरातील महत्वाचा फरासखाना वाहतूक विभाग महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात - Women's Day Special News
पुणे शहरातील वाहतूक विभागाच्या महिला कर्मचारी आता शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूकीचे नियोजन करताना दिसणार आहेत.
पुणे शहरातील महत्वाचा फरासखाना वाहतूक विभाग महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात
या विभागात एकुण 35 महिला कर्मचारी काम करणार आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीचे नियोजन करताना आता एकही पुरुष कर्मचारी आढळणार नाही. या भागात आता महिला कर्मचारीच वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या या महिला वाहतूक विभागामध्ये पोलीस निरीक्षक स्वाती थोरात काम पाहणार आहेत. स्वतंत्र विभाग सुरु केल्याने आता महिला कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे.