महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात केंद्राचा जीएसटी फक्त असावा इतर कर रद्द करावेत, व्यापारी वर्गाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

राज्याचा अर्थ संकल्प ६ मार्चला मांडला जाणार आहे. या अर्थ संकल्पाकडून व्यापरी वर्गाच्या इतर कर रद्द करण्याच्या अपेक्षा आहेत.

Traders expect Budget to cancel other taxes
राज्यात केंद्राचा जीएसटी फक्त असावा इतर कर रद्द करावेत, व्यापारी वर्गाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

By

Published : Mar 5, 2020, 11:40 PM IST

पुणे -राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना विविध क्षेत्रांच्या या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत. तशा व्यापारी वर्गाच्याही या अर्थसंकल्पाकडून आशा आहेत. देशामध्ये 'वन नेशन वन टॅक्स' ही पद्धत अवलंबली जात असताना महाराष्ट्र राज्यात मात्र एकच कर पद्धत नाही. महाराष्ट्रात जीएसटीसोबतच इतर करही आकारले जात असल्याने व्यापारी वर्ग नाराज आहे.

राज्यात केंद्राचा जीएसटी फक्त असावा इतर कर रद्द करावेत, व्यापारी वर्गाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर असलेले कर रद्द करावेत, राज्यभरातील मार्केट यार्डांमध्ये असलेला सेस रद्द करावा, अशी अपेक्षा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आपल्या या अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details