पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यासह पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) झाला. पावसात सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांची संख्या ही यंदा वाढत असून, नवनवीन ठिकाणी पर्यटक हे गर्दी करू लागले आहे. अनेक गड-किल्ले तसेच सह्याद्रीच्या विविध ठिकाण हे सेल्फी पॉइंट, धबधबे पर्यटकांचे आकर्षण बनू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ( Mulshi Taluka ) धामण ओहोळ हे एक गाव ( Dhaman Ohal village ) आहे. या ठिकाणी लिंग्या नावाचा घाट असून त्या घाट परिसरात एक उंच सुळका आहे. या सुळक्याची गावकरी हे पूजा करतात. याला देव मानतात.
स्थानिक या सुळक्याला मानतात देव : स्थानिक नागरिक या सुळक्याला देव मानतात. येणाऱ्या पर्यटकांनादेखील वारंवार स्थानिक ग्रामस्थ सांगतात. परंतु, तरीही नागरिक हौसेने, मौजेने येथील सुळक्यावर चढून त्याचे पावित्र्य तर नष्ट करतातच. आणि स्वतःचा जीवदेखील धोक्यात घालतात. तो सुळका खूप निमुळता असतानाही त्यावर अनेक पर्यटक आपला व्हिडीओ, फोटो काढण्यासाठी वर चढतात. आणि धोकादायक पद्धतीने फोटो, व्हिडीओ काढतात. त्या ठिकाणी धरण्यासाठी कुठलीही सुरक्षा नाही. जर एखादा पर्यटक तोल जाऊन खाली पडला तर मोठी दुर्घटनाही घडू शकते.