पिंपरी-चिंचवड:पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टी चा इशारा हवामान विभागा कडुन देण्यात आला आहे. त्यामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून पर्यटनस्थळी पोहचत आहे. आणि धोकादायक पद्धतीने वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांना भुशी धरणावरून, लोणावळा ( Lonavala Police ) पोलिसांनी हुसकावून लावल्याच बघायला मिळत आहे.
धोकादायक स्थळी जाण्यास बंदी:लोणावळ्यातील ( Lonavala)पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. आज आणि उद्या रविवार पर्यंत हे आदेश लागू असतील. लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटन स्थळी जाणारे मार्ग बॅरिगेट्स लावून बंद केलेत. स्थानिक नागरिक आणि हॉटेल मधील बुकिंग पाहून पोलीस धोका नसलेल्या पर्यटनस्थळाकडे सोडत आहे. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट हे पर्यटकांविना ओस पडले आहे. परंतु, काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट भुशी धरण किंवा इतर धोकादायक ठिकाणी जात असल्याच पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. त्यामुळं पर्यटकांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.