जुन्नर(पुणे) : किरकोळ आणि ठोक बाजारातही टमाट्यांचे दर गडगडल्याने जुन्नरमधील टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने टमाटे काढणीचाही खर्च निघत नसल्याने टमाटे शेतातच सडू लागल्याचे चित्र इथे बघायला मिळत आहे.
टमाट्यांना कवडीमोल दर, शेतकरी आर्थिक संकटात - junnar
जानेवारी ते मार्चदरम्यान टमाट्यांची आवक कमी असते. असे असतानाही बाजारात टमाट्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे जुन्नरमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
टमाट्यांना कवडीमोल दर, शेतकरी आर्थिक संकटात
आवक कमी तरीही बाजारभाव कवडीमोल
जुन्नर तालुक्यात टमाट्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. टमाट्यांसाठी नारायणगाव बाजार समितीत मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीतून संपुर्ण देशभरात टमाटे पाठविले जातात. जानेवारी ते मार्चदरम्यान टमाट्यांची आवक कमी असते. असे असतानाही बाजारात टमाट्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे जुन्नरमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.