महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात गुरुवारी 'नो होंकिंग डे' - no hinking day in pune

गुरुवारी 12 डिसेंबरला पुण्यात 'नो होंकिंग डे' पाळला जाणार आहे. गाडी चालवताना हॉर्नचा उपयोग कमीतकमी आणि गरज असेल तेव्हाच करा, हा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

no honking day
नो होंकिंग डे

By

Published : Dec 11, 2019, 10:37 PM IST

पुणे- गुरुवारी 12 डिसेंबरला पुण्यात 'नो होंकिंग डे' पाळला जाणार आहे. गाडी चालवताना हॉर्नचा उपयोग कमीतकमी आणि गरज असेल तेव्हाच करा, हा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक हास्य क्लबचे जेष्ठ नागरिक, आयटी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि वाहतूक पोलीस या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मास्टर बलास्टर सचिन तेंडुलकर

हेही वाचा -फिरोदिया कंरडकाच्या विषय निवडीवर निर्बंध, 'या' विषयांवर बंदी

सकाळी साडे आठ वाजल्यापासून पुण्यातील 30 चौकांमध्ये उभे राहून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात ३७ लाख वाहनांची नोंद आहे. त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजवल्यास निर्माण होणाऱ्या गोंगाटामुळे अनेकांना शारिरीक व्याधी आणि समस्यां जडत आहेत. हे रोखण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या नो होंकिंग डेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील शुभेच्छा दिल्यात आणि हॉर्नचा उपयोग कमीतकमी करण्याचे आवाहन त्याने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details