महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Corona Update : चिंताजनक! पुण्यात आज 5 हजार 375 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद - Omicron In Pune

राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ ( Pune Corona Patient Increase ) होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण ( Omicron In Maharashtra ) तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णदेखील वाढत असल्याने पुन्हा चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे. पुणे शहरात ( Pune Today Corona Patient Number ) आज 5375 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

Pune Corona Update
Pune Corona Update

By

Published : Jan 16, 2022, 6:48 PM IST

पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ ( Pune Corona Patient Increase ) होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण ( Omicron In Maharashtra ) तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णदेखील वाढत असल्याने पुन्हा चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे. पुणे शहरात ( Pune Today Corona Patient Number ) आज 5375 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे कोरोना अपडेट

शहरात दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णसंख्या -

पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे. शहरात आज अखेरीस 34 हजार 187 एवढे सक्रीय रुग्ण झाले आहेत.

शहरात आज 5375 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण -

पुणे शहरात आज 5375 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात 3090 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आज कोरोनाने 5 मृत्यू झाले आहे. शहरातील सक्रीय रुग्ण संख्या ही 34 हजार 187 एवढी झाली आहे.

हेही वाचा -Amravati Shivaji Maharaj Statue Removed : बाळासाहेबांचा आदर्श कुठे हरवला? खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details