पुणे:शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे, गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात 600 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आज पुण्यातमध्ये तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी देखील कोरोनाचे 661 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, शहर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोना अटोक्यात आल्याचे चित्र होते, मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज तब्बल 743 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे. तर आज दिवसभरामध्ये 6 हजार 514 जणांच्या कोरोना चाचण्यात करण्यात आल्या आहेत.