पुणे - माजी वनमंत्री संजय राठोड यांना ज्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला त्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी पूजाच्या आईवडिलांचा जवाब नोंदवला आहे. ' पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आमचे कोणावरही आरोप नाहीत, तिच्या मृत्यूनंतर याप्रकरणात राजकारण केले गेले. पूजाच्या मृत्यूनंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता ' असा जवाब पूजाच्या आईवडिलांनी नोंदवला असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली. वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मूळची परळीच्या असलेल्या टिक टॉक स्टार पूजा चव्हाण (वय 22) हिने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील वानवडी परिसरात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणात पुढे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा मागणीसाठी आंदोलनंही केली होती. तर मंत्र्याला वाचविण्यासाठी पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजले होते. त्यामुळे संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही; पालकांनी नोंदवला जबाब
पूजा चव्हाण (वय 22) हिने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील वानवडी परिसरात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणात पुढे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा मागणीसाठी आंदोलनंही केली होती.
पूजाच्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही- पूजाचे पालक
या संपूर्ण प्रकारानंतर पूजाच्या आईवडिलांनी मात्र पूजाच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरले नव्हते. वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याच प्रकरणात वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाणच्या आई वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याबाबत वानवडी पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. तिच्या आई वडिलांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवला. त्यात त्यांनी पूजाच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरलेले नाही.