महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Kesari पुण्यात वर्षा अखेरिस रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार, पत्रपरिषदेत माहीती

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' (thrill of Maharashtra Kesari played) स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये (end of the year in Pune) रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी 'संस्कृती प्रतिष्ठानला' मिळाली आहे, अशी माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली.Maharashtra Kesari

Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी

By

Published : Sep 14, 2022, 6:02 PM IST

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' (thrill of Maharashtra Kesari played) स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये (end of the year in Pune) रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी 'संस्कृती प्रतिष्ठानला' मिळाली आहे. कोथरूडमध्ये ही स्पर्धा भव्य स्वरूपात करण्याचा मानस आहे, अशी माहिती 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. Maharashtra Kesari

पत्रकार परिषदेत माहीती देतांना संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक मुरलीधर मोहोळ

पत्रकार परिषदेत अनेक मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, पिंपरी चिंचवडचे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावंडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.



कुस्तीप्रेमींना निमंत्रित करणार : यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'स्वर्गिय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. त्यातच आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे. ज्या मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली होती, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा ठरेल. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र स्विकारले आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाअखेरीस या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, तसेच कुस्तीप्रेमींना निमंत्रित करण्यात येणार आहे.


आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या : सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून; राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. ३३ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील, ४५ तालीम संघातील ९०० मल्लं या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी मिळणार आहे. आणि त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.



मानाची गदा : अशोक मोहोळ म्हणाले की, 'मामासाहेब मोहोळ यांच्या गावात मोहोळ कुटुंबीय ही स्पर्धा भरवत आहेत; ही आनंदाची बाब आहे. तसेच गेली ३८ वर्षे 'महाराष्ट्र केसरी'ची गदा देण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. जो 'महाराष्ट्र केसरी' ठरतो, त्याच्या हातात मानाची गदा देताना समाधान वाटते.


विलास कथुरे म्हणाले की, "विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होतील. ९०० कुस्तीगीर, ९० व्यवस्थापक, ९० मार्गदर्शक, १२५ तांत्रिक अधिकारी, ९० पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत.Maharashtra Kesari

ABOUT THE AUTHOR

...view details