पुणे -पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. गुन्हे शाखेतील पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे आणि वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक बसवराज धोंडाप्पा चिट्टे, अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेत पोलीस नाईक असलेले सचिन गायकवाड यांनी बाणेर येथील डेडिकेटेड केअर सेंटरमध्ये घुसून डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेजबाबदार, बेफिकीर आणि पोलीस दलाला बदनाम करणारे वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
पुणे : शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन - पुणे जिल्हा बातमी
पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. गुन्हे शाखेतील पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे आणि वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक बसवराज धोंडाप्पा चिट्टे, अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अवैध धंदेवाल्यांची संबंध ठेवल्याचे व वरिष्ठांविरुद्ध वर्तमानपत्रात बातमी दिल्याचे आरोप होते. चौकशीअंती त्यांच्यावर असणारे हे आरोप सिद्ध झाले होते. त्यानंतर पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा आणणारे अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी त्यांचे निलंबन केले.
तर पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिट्टे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी आरोप आहेत. चिट्टे यांनी पुणे शहर हद्दीत जाहिरात फलक लावण्यासाठी वाहतूक विभागाचा नाहरकत दाखला देण्यासाठी तीन लाख साठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. चिट्टे यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र सिसवे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
हेही वाचा -'प्लास्टिक टोमॅटो' रोगामुळे शेतकरी हैराण