पुणे :सर्वाधिक वायू प्रदूषण नोंदवल्या जाणाऱ्या राज्यातील दहा 'हॉटस्पॉट'मध्ये (Air pollution 10 Hotspot) पुण्यातील तीन ठिकाणांचा समावेश झाला आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत (एन-कॅप) प्रदूषणाचे तीन हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. यात शहरातील प्रदूषणाच्या नोंदींच्या आधारे शिवाजीनगर येथे सर्वाधिक हवा प्रदूषण होत असल्याची धक्कादायक माहिती या नोंदीतून समोर आली आहे. या पाठोपाठ कर्वेनगर (Karvenagar),भोसरीचा (Bhosari) नंबर लागत आहे.
Air Pollution in Pune : राज्यातील दहा 'हॉटस्पॉट'मध्ये पुण्यातील तीन ठिकाणे - भोसरी
सर्वाधिक वायू प्रदूषण नोंदवल्या जाणाऱ्या राज्यातील दहा 'हॉटस्पॉट'मध्ये (Air pollution 10 Hotspot) पुण्यातील तीन ठिकाणांचा समावेश झाला आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत (एन-कॅप) प्रदूषणाचे तीन हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
लॉकडाऊननंतर प्रदूषणाच्या स्तरात वाढ
गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनामुळे बहुतांश वेळ राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात कमी आली होती. उद्योगधंदे बंद असल्याने वाहतूक कमी प्रमाणात असल्याने प्रदूषणाचा स्तर घटला होता. लॉकडाऊन उघडल्यानंतर मात्र परिस्थिती जैसे झाली आहे. हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
शिवाजीनगर, कर्वे रस्ता आणि भोसरी हे प्रदूषणाचे हॉटस्पॉट
एन-कॅप' कार्यक्रमांतर्गत देशभरातील काही निवडक शहरांत हवेच्या सातत्याने नोंदी घेण्यात येत आहेत. यासाठी एन-कैप ट्रैकर संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक प्रदूषित स्थळांचा समावेश म्हणून हॉट स्पॉट म्हणून करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर, कर्वे रस्ता आणि भोसरी ही तीन ठिकाणे प्रदूषणाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. प्रदूषणाच्या नोंदीनुसार शिवाजीनगर येथे 'पीएम २.५' या हानिकारक प्रदूषकाचे प्रमाण १४२ प्रती क्युबिक घनमोटर इतके नोंदविण्यात आले. तर कर्वेनगर येथे ८३ प्रती क्युबिक घनमीटर आणि भोसरी येथे हे प्रमाण १२१ तो क्युविक घनमीटर इतके नोंदविले आहे.
थंडीच्या दिवसात प्रदूषण अधिक
थंडीत हवा जड असल्याने ती वातावरणात उंचावर जात नाही. परिणामी, या काळात विविध माध्यमांतून होणारे घातक वायूंचे उत्सर्जन, सूक्ष्म, अतिसूक्ष्म धुलीकण वातावरणात राहतात. परिणामी या चार महिन्यांत हवा प्रदूषणात वाढ नोंदवली जाते. पावसाळ्यात प्रदूषके आणि धूलिकण पाण्यात वाहून जातात. उन्हाळ्यात हवा हलकी असल्याने प्रदूषके वातावरणात उंचावर जातात. परिणामी, पाऊस आणि उन्हाळ्यात वायू प्रदूषणात घट होते.
प्रदूषणावर नियंत्रणासाठी उपयोजना आवश्यक
वाढते शहरीकरण, उद्योगधंदे, बांधकाम, वाहनांची वाढती संख्या ही सर्व कारणे प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. या माध्यमातून वाढणारे प्रदूषणावर नियंत्रण अन्याचे काम महापालिकेने करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळातर्फे अद्याप याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अशी माहिती एमपीसीबीचे उप-क्षेत्रीय अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली आहे.
हेही वाचा -Cyclone Jawad Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; जोवाड चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी !