पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. यात शिरगाव पोलीस चौकी हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी - तिघे जण जखमी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत.
भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पत्र्याच्या कठड्याला जाऊन धडकली. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मूनशिर आलम (वय-३४, रा. अंधेरी, मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात त्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तो मुंबईहून पुण्याकडे जात होता. त्यादरम्यान हा अपघात घडला.
याशिवाय इतर दोन अपघात कामशेत बोगद्याजवळ पहाटे चारच्या सुमारास झाले आहेत. यात किलोमीटर क्रमांक ७० आणि ७२ येथे अपघात झाला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या इर्टीगा गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली. यात किरकोळ नुकसान झाले असल्याने वाहन चालक तेथून निघून गेला. तर तिसऱ्या अपघातात होंडा सिटी गाडीने अज्ञात वाहनाला मागच्या बाजूला धडक दिली. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.