पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. गुरुवारी शहरात एकूण 314 जण कोरोना बाधित आढळले आहेत. 168 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील बाधितांची संख्या 3 हजार 544 वर पोहोचली आहे. पुणे शहरातील गोखले नगर येथील 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
COVID-19 : पिंपरीत गुरुवारी 314 रुग्णांची नोंद; 168 जण कोरोनामुक्त - Pcmc corona cases
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी 314 जणांची वाढ झाली आहे. तर 168 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बाधितांची संख्या 3 हजार 544 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 168 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील बाधित रुग्णांची संख्या मोठी दिसत असली तरी आतापर्यंत 2 हजार 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, मुळातच शहरातील नागरिक हे फिझिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने अनेकदा पालिका प्रशासनावर पिंपरी मार्केट बंद करण्याची वेळ आली होती. कोरोना संदर्भात वारंवार जनजागृती केली जात आहे. परंतु, नागरिक नियमांची पायमल्ली करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.