पुणे -पुणे रेल्वे स्टेशन येथे सकाळी 10 :30 वाजताच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या असल्याची माहिती समोर आली होती. पण त्यात कोणतेही स्फोटक नसून याचा तपास पुणे पोलीस करत आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आले होते. या ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले होते. पण आत्ता रेल्वे स्टेशन सुरळीत सुरू करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे स्थानकात आढळलेली वस्तू स्फोटक नाही; पोलीस आयुक्तांची माहिती - जिलेटीनच्या कांड्या पुणे
रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने रेल्वे स्टेशन परिसर पोलिसांकडून खाली करण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. त्या निकामी करण्याची कारवाई सुरू केली आहे.

बॉम्ब शोधक आणि नाशक पथक
पुणे रेल्वे स्थानकात आढळलेली वस्तू स्फोटक नाही
आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी प्रत्यदर्शी मंगेश पवार यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली.
प्रत्यक्षदर्शी मंगेश पवार यांच्याशी बातचीत
Last Updated : May 13, 2022, 8:03 PM IST