महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर 6 जणांना चिरडले; 3 ठार, 3 जखमी

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर(Solapur Highway) कुरकुंभ येथे महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू(Three Died in Accident) झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident
Accident

By

Published : Nov 27, 2021, 8:59 AM IST

Updated : Nov 27, 2021, 1:04 PM IST

दौंड(पुणे) : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर(Solapur Highway) कुरकुंभ येथे महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू(Three Died in Accident) झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल सायंकाळच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर कुरकुंभ येथील एसबीआय बँकेजवळील चौकानजिक महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातातील मृत व्यक्ती परप्रांतीय कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेच्या साह्याने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी प्रयत्न करून वाहतूक पूर्ववत केली.

हा अपघात कोणत्या वाहनामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Last Updated : Nov 27, 2021, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details