पुणे - धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतासारखा देश एकसंध ठेऊ शकते. त्याच संकल्पनेला छेद देण्याचा आज प्रयत्न होत आहे. तो यशस्वी होऊ देता कामा नये. धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
'आंतरभारती' दिवाळी अंकाचे शरद पवार यांच्या हस्ते मोती बाग या निवासस्थानी मंगळवारी सकाळी झाले. तेव्हा ते बोलत होते. हिंदू - मुस्लीम व इतर समाजात अंतर निर्माण केले जात आहे. कटुतेला शासकीय आधार दिला जात आहे. राजसत्तेचा वापर केला जात आहे. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार केला पाहिजे. या कामी जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.