पुणेपुण्यातील मानाचा तिसरा गणपती The third Ganesha of Pune असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे Guruji Talim Mandal यंदा 132 वे वर्ष आहे. 1887 साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव Public Ganeshotsav सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.
शताब्दी वर्षानंतर गुरुजी तालीम गणपती मंडळाने वर्गणी घेणे बंद केले पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरवात झाली होती. आता तालीम अस्तित्वात नाही. मूषकारूढ स्वरूपातील शाडूच्या मातीची मूळ मूर्ती 1972 साली बनवण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते आणि तत्कालीन नगरसेवक श्यामसिंग परदेशी यांच्या पुढाकारातून ही मूर्ती घडवून घेतली गेली होती.दरवर्षी रंग देऊन ती मूर्ती उत्सवात ठेवली जात होती. काही वर्षापुर्वी फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. मुर्तीसाठी दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सहभागातून घडवण्यात आले आहेत. शताब्दी वर्षानंतर गुरुजी तालीम गणपती मंडळाने वर्गणी घेणे बंद केले. मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते स्वखर्चातून आता प्रत्येक गणेशोत्सवाला लागणारा खर्च करतात.