महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वाइन शॉप फोडत शिवाजीनगरात लांबवले 2 लाख 80 हजार रुपये - pune wine shop news

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीप बंगला चौकात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी वाइन शॉपचे मॅनेजर कश्यप रवासीय (वय 32) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

broke wine shop
broke wine shop

By

Published : Mar 30, 2021, 4:48 PM IST

Updated : Mar 30, 2021, 4:55 PM IST

पुणे - मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी तोंडावर मास्क लावून पुणे शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या एका वाइन शॉपचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दोन लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीप बंगला चौकात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी वाइन शॉपचे मॅनेजर कश्यप रवासीय (वय 32) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीप बंगला चौकात दुकान

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की दीप बंगला चौकात महाराजा वाइन शॉप आहे. यातील फिर्यादी हे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, आज सकाळी त्यांच्या दुकानाशेजारी असणाऱ्या एका हॉटेल चालकाने त्यांना फोन करून दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता चोरी झाली असल्याचे निष्पन्न झाले होते.

सीसीटीव्हीत कैद

चोरट्यानी वाइन शॉपमधील तिजोरी आणि ड्रॉव्हरमधील दोन लाख 80 हजार रुपये चोरून नेले आहेत. चोरीचा हा सर्व प्रकार दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तोंडाला मास्क लावलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम लंपास केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Mar 30, 2021, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details