पुणे -आजकाल कुणाला काय छंद लागलेले असेल याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यात जर एखादा चोर असेल तर त्याचे चोरीचे छंद हे तर खूपच निराळे असतात. असाच वेगळा छंद असलेल्या चोराला पोलिसांनी पकडले आहे. या चोराला पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी thief white colored moped करण्याचा छंद लागला होता. या चोराने ७ पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी केल्या होत्या. अखेर चतुश्रृंगी पोलिसांनी Pune Police त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विवेक वाल्मीक गायकवाड वय २० रा. थेरगांव असे अटक केलेल्य चोराचे नाव आहे.
विवेक हा मूळचा उस्मानाबाद जिल्हात राहणार आहे. तो काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. तो कोणताही काम करत नव्हता. पण त्याला नवीन गाड्या फिरवण्याचा छंद होता. त्याही नवीन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या. म्हणून तो पार्किंगमधून नवीन गाड्या चोरायचा. चोरीची गाडी फिरवायचा आणि त्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार व्हायचा. विशेष म्हणजे विवेक हा गाडी चोरल्यावर आणि त्यांनतर ती फिरवल्यावर तो गाडी विकत नव्हता.