पुणे : सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा दुसरा भाग आज समोर आला. या मुलाखतीवर मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस (MNS Spokesperson Hemant Sambhus) यांनी सडकून टीका केली आहे. 'ज्यांनी मुलाखत दिली ते घरातले. ज्यांनी मुलाखत घेतली तेही घरातले आणि ज्यांनी छापली तेही घरातीलच, म्हणजे हा पक्ष आहे की घरात बसून चालणारे राजकारण आहे', असा टोला त्यांनी लगावला आहे.
हिंदुत्व सोडलेला पक्ष: हिंदुत्वाची परिभाषा आता त्यांनी सांगू नये कारण हा पक्ष हिंदुत्व सोडलेला पक्ष आहे. हिंदुत्वाचे सगळे नियम, दाखले सगळे त्यांच्याकडून गेलेले आहे. त्यामुळे त्यांनी आता हिंदुत्वावर बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला. हे बाळासाहेबांचे वारसदार होते. तर बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा प्रमुख अजेंडा त्यांनी पुढे का नाही नेता. जेव्हा ते काँग्रेस शेजारी जाऊन बसले तेव्हाच सगळे संपले. तिथेच त्यांचे हिंदुत्व सुटले. आणि तसे नसते तर ज्या-ज्या भूमिका बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी घेतल्या होत्या, त्या आम्हाला का घ्याव्या लागल्या. राज ठाकरेंनी भोंग्यांचा विषय घेऊन हिंदुत्व कसे प्रज्वलित करतात, हे दाखवून दिले आहे. असे त्यांनी म्हणले आहे.
हेमंत संभुस यांच्याशी संवाद साधतांना ईटिव्ही प्रतिनिधी
चाळीस आमदार मनसेत आले तर स्वागतच :दुसरीकडे शिवसेनेचे 40 आमदार मनसेत विलीन झाले: तर आम्ही त्यांचे स्वागत करू, तांत्रीक बाबी तपासून जर स्वतः कोणी प्रस्ताव देत असेल. त्यातून पक्ष वाढणार असेल आणि राज ठाकरेंनी तो स्वीकारला; तर एकही मनसैनिक त्यांच्या पुढे जाणार नाही. आता महाराष्ट्रातील नागरिक ठरवतील की, हिंदुत्वाचा खरा पुरस्कृत पक्ष कोणता. अहो तुमचे ४० आमदार तुम्ही हिंदुत्वाचा अजेंडा राबवत नाहीत म्हणून बाहेर पडतात. त्यामुळे आता कोण हिंदुत्व पुरस्कृत करतेय आणि कोण हिंदुत्व राबवते आहे, हे राज्यातील जनतेला दिसतेय. राज्यात मनसे हा एकमेव पक्ष आहे जो हिंदुत्वाची कास धरून चाललाय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी तपासून घ्यावं केमिकल लोचा कोणाचा झालाय :खरी गरज उद्धव ठाकरेंना हे तपासण्याची आहे की, नक्की केमिकल लोचा कोणामध्ये आहे. यांना न सांभाळता येणारे हिंदुत्व खटकले आहे. ज्या हिंदुत्वावर यांनी मते मागितली, ज्या हिंदुत्वावर लोकांनी यांना निवडणून दिले. त्याच हिंदुत्वाला फाटा देत सत्तेच्या लालसेपोटी हे वर्षानुवर्षे असणाऱ्या विरोधकांसोबत हातमिळवणी करून सत्तेत जाऊन बसले. नागरिकांनी राज ठाकरेंना हिंदुजननायक ही पदवी दिली आहे. नागरिकांना राज यांच्या मधे बाळासाहेबांची छबी दिसतेय. हाच पोटसुळ त्यांना उठलाय, असे म्हणत संभुस यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले.
हेही वाचा :Uddhav Thackeray : शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होणार? -उद्धव ठाकरे