महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वैज्ञानिक युगात अद्यापही अंधश्रद्धा आहेच - डॉ.जयंत नारळीकर - Dr. Jayant Narlikar news

नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.

By

Published : Jan 24, 2021, 9:50 PM IST

पुणे -मोबाईल सारखे उपकरण सर्वत्र सहजतेने हाताळले जाते. मात्र, बहुतांश लोक याचा उपयोग सकाळी शुभ दिवस कोणता आहे, हे पाहण्यासाठी करतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार झपाट्याने वाढला तरी विज्ञानावाद मात्र अद्याप मागेच आहे. वैज्ञानिक युगात अद्यापही अंधश्रद्धा आहेच अशी खंत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नारळीकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मराठी साहित्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्रीत करून विज्ञानावादी युगातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरच जागतिक भाषेपर्यंत पोहचता येईल-

मराठी ही ज्ञानभाषा असली काय किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून ही परिभाषा बदलणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मराठीमध्ये होणारे इंग्रजी भाषेचे आक्रमण? आणि त्याचा सहजतेने होणारा वापर हे चुकीचे असून सोप्या आणि सुटसुटीत शब्दसंग्रह करून त्यांचा वापर मराठी बोलताना झाला पाहिजे. मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर केला तरच जागतिक भाषेपर्यंत पोहचता येईल, असेही यावेळी डॉ.जयंत नारळीकर म्हणाले.

विज्ञान, गणितासारख्या विषयांचे ज्ञान हे मातृभाषेतून देणे महत्वाचे-

पूर्वी उच्चभ्रू व्यक्तींमध्ये इंग्रजी शाळांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कल होता. आता मात्र सर्वसामांन्य व्यक्तींमध्ये देखील अशीच संकल्पना रुढ झाली असून हे अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान, गणितासारख्या विषयांचे ज्ञान हे मातृभाषेतून देणे महत्वाचे आहे. हे केले जात नसल्यानेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोन सोडून अंधश्रद्धा पसरत आहे. तरुणांनी मराठी साहित्यात लिहते होऊन व्यक्त झाले तर वैज्ञानिक दृष्टीकोनही वाढेल आणि अंधश्रद्धेवर मात करता येईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा-शेतकऱ्यांचे 'लाल वादळ' मुंबईत धडकले!

ABOUT THE AUTHOR

...view details