महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Weather in Maharashtra : शुक्रवारपासून कमी कालावधीत जास्त पाऊस,अतिवृष्टीची शक्यता नाही - डॉ. रामचंद्र साबळे हवामान तज्ञ - Dr Ramchandra Sable Meteorologist

राज्यात सध्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस ( Above average rainfall in maharashtra ) पडत आहे. जुलै ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने ( Department of Meteorology Pune ) वर्तवला आहे. मात्र, कोठेही अतिवृष्टी ( Heavy rain will not fall in Maharashtra ) होणार नाही अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Weather in Maharashtra
महाराष्ट्रातील हवामान

By

Published : Jul 26, 2022, 6:09 AM IST

पुणे - महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्ह्यापैकी 35 जिल्हामध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस ( Above average rainfall in maharashtra )पडत आहे. कमी कालावधीत जास्त पावसाचा अंदाज ( Department of Meteorology Pune ) बरोबर ठरत आहे. जुलै ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस पडणार आहे. कुठेही अतिवृष्टी ( Heavy rain will not fall in Maharashtra ) होणार नाही. असमान पाऊस असला तरी, पावसाची स्थिती समाधानकारक असण्याची शक्यता आहे.

विदर्भात सर्वाधिक पाऊस - विदर्भातल्या पावसाचा विचार करायचा तर, गडचिरोली गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये आणखी चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आताही पाऊस सुरू आहे. इथे 103 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडत आहे. मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये नांदेड हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये पाऊस थांबण्याची गरज आहे.

शुक्रवारपासून कमी कालावधीत जास्त पाऊस

हेही वाचा -हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक : कावडीयांना वेदनांपासून मुक्त करणारा मुस्लीम अवलिया; 22 वर्षांपासून कावड यात्रेकरुंची करतो सेवा

अतिवृष्टी होणार नाही -शुक्रवारपासून सातारा सांगली जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मिनिमम 40 मिलिमीटर पाऊस साची शक्यता आहे तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस-पस्तीस मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार करता पुणे जिल्ह्यातसुद्धा तीस ते पस्तीस टक्के पाऊस मिलिमीटर पाऊस पडू शकतो. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस हे हंगामाचे वैशिष्ट्य असल्यामुळे पाऊस जास्तीचा होईल परंतू अतिवृष्टी सारखी स्थिती कुठेच नसणार आहे. पूर्व विदर्भात सध्या जास्त पाऊस होते आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, नागपूर या ठिकाणी 102 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र या जिल्ह्यात पाऊस अजूनही सुरू आहे. पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. तर, काही धरणातून पाणी ओसांडून वाहत आहे. येत्या काळात पावसाचा जोर असणार आहे. मात्र, कोणत्याही भागात अतिवृष्टी होण्याची शक्याता नाही असे, हवामान विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा -Breaking : गुजरातमध्ये धक्कादायक घटना: बेकायदेशीर दारु पिल्याने 8 जणांचा मृत्यू!

ABOUT THE AUTHOR

...view details