पुणे -सर्वत्र 31 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. पुणे शहरात 3566 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून घरगुती गणपतींची संख्या ही 454686 इतकी आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहरातील पोलीस आयुक्त ते सर्व पोलीस कर्मचारी मिळून यंदा 7 हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. Police Commissioner Amitabh Gupta press conference तसेच, पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता 1709 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी गुप्ता यांनी दिली आहे.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना गणेश उत्सव काळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे. Public Ganeshotsav Pune गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते शांतता समिती, पोलीस मित्र समिती, पोलीस आयुक्त परिमंडळ, पोलीस उपयुक्त तसेच पोलीस स्टेशन स्तरावर एकूण 61 बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाच्या पत्रिका कार्यकर्ते यांना यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.