महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

100 असे प्रसंग आहेत की ज्यात महाआघाडी सरकार कायद्याने बरखास्त होईल - चंद्रकांत पाटील - State Government will Dismissed

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत 100 असे प्रसंग मी काढलेले आहेत, की ज्या प्रसंगात सरकारच्या बरखास्तीशिवाय कायद्याने (State Government will Dismissed) दुसरे काहीच असू शकत नाही, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil

By

Published : Dec 17, 2021, 8:09 PM IST

Updated : Dec 17, 2021, 9:08 PM IST

पुणे -जी लोकशाही आपण स्वीकारली त्यात बरखास्तीचे नियम ठरलेले आहेत. तुमच्या आमच्या हातात बरखास्तीची मागणी करणे आहे. ही मागणी तर आम्ही अनेक वेळा करत आहोत. 100 असे प्रसंग मी काढलेले आहेत, की ज्या प्रसंगात बरखास्तीशिवाय (State Government will Dismissed) कायद्याने काहीच असू शकत नाही, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.

या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचं ठरवलंय -

आधी आरोग्य भरतीच्या परीक्षा पेपरफुटी आणि मग म्हाडा पेपरफुटी प्रकरण आणि आज टीईटी परीक्षेत देखील पेपरफुटी प्रकरणात परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना आज अटक करण्यात आली आहे. या तिन्ही पेपरफुटी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारलं असतां ते म्हणाले की या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचं ठरवलं आहे. मग ते एसटी संप असू दे किंवा विविध विभागातील परीक्षा असू दे. एमपीएससीचा तर सत्यानाश करून टाकला आहे. हे सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय होत असेल ते सरकारला दिसत नाही. यांचेच हात बरबटलेले असल्याने चौकशी समिती नेमून काय होणार आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
पेपरफुटी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा -
पेपरफुटी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशमार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार आहोत. परंतु गोंधळ घालून अधिवेशनाचे कामकाज होऊ द्यायचं नाही, असं या आधीचा अनुभव आहे. मुळात हे अधिवेशन होणार का नाही, याबाबतच प्रश्न आहे असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
Last Updated : Dec 17, 2021, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details