पुणे -जिल्ह्यातील राजगुरुनगर पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या प्राचीन सिध्देश्वर मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील शिवलिंगावरील 10 किलो वजनाचे चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी चोरी केले असुन चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवारी सकाळी पहाटेच्या वेळी पुजारी मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
राजगुरूनगरमधील शिवमंदिरात चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदीरात चोरट्यांचा डल्ला..शिवलिंगावरील 10 किलो चांदीचा कवच गेला चोरीला..घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...
हेही वाचा... पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण...
सिध्देश्वर मंदिरात पाणी, दूध व इतर पदार्थ भाविकाकडून थेट शिंवलिंगावर टाकले जातात. त्यामुळे शिवलिंग जीर्ण होते, त्यामुळे भाविकांच्या आर्थिक सहाय्यातून 10 किलो चांदीतून शिवलिंगावर कवच तयार करण्यात आले होते. मात्र या शिवलिंगावरील चांदीच्या कवच्यावर चोरट्यांची नजर पडली आणि रात्रीच्या सुमाराम अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन चोरी केली. राजगुरुनगर पोलीस व देवस्थान ट्रस्टी यांच्या समवेत मंदिर परिसराची पाहणी केली. यानंतर सीसीटीव्ही कॅमेरातील व्हिडिओनुसार चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.